कल्याण डोंबिवलीत प्राणी संग्रहालय उभारा : विद्यार्थ्यांची मागणी 

कल्याण डोंबिवलीत प्राणी संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी डोंबिवलीतील जय भारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पालिकेकडे केली. विशेष म्हणजे या चिमुकल्यांनी प्राण्यांची वेशभूषा करत पालिका मुख्यालयात प्रवेश केल्याने सर्वंचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षकांनी पालिका उपायुक्त विजय पगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केल. प्रशासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन पालिका उपायुक्त विजय पगार यांनी दिलं.  शहरात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी नेचर पार्क ,बॉटनिकल गार्डन ,प्राणी संग्रहालय नसल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या विद्याथ्याँना मुंबई गाठावी लागते. स्मार्ट सिटीसाठी कोट्यावधी चा निधी खर्च होणार आहे त्यामध्ये नेचर पार्क ,बॉटनिकल गार्डन ,प्राणी संग्रहालय निर्माण करावे अशी मागणी शाळाकडून केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *