मुंबई, दि. ५ : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४ तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या (६ ऑक्टोबरला ) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी :
धुळे- ६० टक्के
नंदुरबार- ६५, टक्के
अकोला- ६३ टक्के
वाशीम- ६५ टक्के
नागपूर- ६० टक्के
पालघर- ६५ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *