डोंबिवली : फटाके फोडण्यावरून चौकडीने एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली. बबलू चव्हाण (22) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सकरूद्दीन शेख, मिथीलेश लोधी, राजू, रहिम या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.


कल्याण पूर्वेतील 90 फिट रोडला रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्रिपुल परिसरात राहणार बबलू चव्हाण हा पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. रात्री तो 90 फिट रोडला असलेल्या मोहन सृष्टी इमारतीसमोर मित्र आदिल खान याच्यासोबत उभा होता. दरम्यान त्या ठिकाणी चोघेजण फटाके फोडत होते. तुम्ही आमच्याजवळ फटाके फोडू नका, असे बबलू याने त्यांना सांगितले. याचा राज आल्याने त्या चौघांनी त्यास हाताच्या ठोश्या-बुक्क्यांनी मारहाण केली. तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी देखील दिली. यानंतर सकरुद्दीन याने त्याच्याजवळील फायटरने बबलू याला मारहाण केली आहे.
बबलूने दिलेल्या तक्रारीच्या आधारे टिळकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!