कल्याण / प्रतिनिधी : पत्रकार, लेखक संजय सोनवणे लिखित “अमिबा…” हा नाट्यानुभव दिर्घन्क लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “अमिबा…”च्या तालमींचा शुभारंभ शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी, देवजी हरिया महाविद्यालय, शहाड येथे सायंकाळी ५.३० वा. होणार असून, डॉ गिरीष लटके, सचिव-शाहू शिक्षण मंडळ आणि रंगकर्मी सुधाकर वसईकर यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी देवेंद्र शिंदे, संचालक- टू मस्किटयर्स आणि लेखक संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यावेळी संहिता संवादातून नाट्य चर्चा होणार आहे. अमिबा हा दिर्घन्क मानवी जीवनावरील भाष्य असून याचे सादरीकरण टू मस्किटयर्सचे कलाकार करणार आहेत. नेपथ्य आणि प्रकाशयोजना सुनील देवळेकर यांची असून, पार्श्वसंगीत नरेश गायकवाड यांचे आहे. याचे दिग्दर्शन सुधीर चित्ते करणार आहेत. एप्रिल 2021 च्या शेवटच्या आठवड्यात हे नाटक रसिकांच्या भेटीस येणार आहे.