कुस्तीपट्टू निलेश मनाला चटका लावून गेला.. 
कोल्हापूर :-कोल्हापूरचा कुस्तीपटू निलेश विठ्ठल कंदुरकर याची सहा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर संपली. कुस्तीच्या  आखाडय़ात एकचक्री डावातून निसटण्याच्या प्रयत्नात मज्जातंतूला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर  आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली जाण्याने कुस्तीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत असून, निलेशचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लागुन गेलाय.
१ एप्रिल रोजी श्री. जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त गावांत दरवर्षीप्रमाणे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात निलेशची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनाची गर्दी झाली होती.  कुस्ती रंगतदार बनलेली असतानाच प्रतिस्पर्धी पैलवानाच्या एकचक्री डावातून निसटण्याच्या प्रयत्नात निलेश मानेवर पडला, यामुळे त्याच्या मणक्यासह मज्जातंतुला जबर दुखापत झाली. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे बनले होते, त्याला कोल्हापुरातून कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र निलेशच्या मज्जातंतूला इतका जबरदस्त मार लागला होता की त्याने उपचारांनाही प्रतिसाद दिला नाही.
कुस्तीची परंपरा 
पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावात निलेशच्या घरी आजोबांपासुनच कुस्तीची परंपरा आहे. वडील विठ्ठल हे सुद्धा पैलवान म्हणुनच पंचक्रोशीत नावाजलेले. त्यामुळे मोठा भाऊ सुहास बरोबरच निलेशनेही तालमीत धडे गिरविले. वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत, तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलातच त्याचा कुस्तीचा सराव सुरु होता. अवघ्या चार ते पाच मिनिटांतच कुस्ती निकाली काढणारा मल्ल अशी निलेशने ख्याती मिळविली होती. त्यामुळे त्याची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची चांगलीच गर्दी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!