ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयात यापुढे ५० टक्‍के सूट – महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्‍या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्‍याची दिशा मिळणार असल्‍याने ज्‍येष्‍ठ नागरिक ही देशाची खरी संपत्‍ती आहे.  असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मुंबईत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळयात केले. तसेच ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयामध्‍ये यापुढे ५० टक्‍के सुट देणार असल्‍याचेही महापौरांनी यावेळी जाहिर केले.

माटूंगा येथील यशवंत नाटरू मंदिरात जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार समारंभ पार पडला.त्‍यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. महापौर म्‍हणाले की, ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांच्यातील तरूणांसारखी ऊर्जा जाणवली. आपण वयाने जरी मोठे असलात तरी मनाने तरुण राहले की वयाची जाणिव होत नाही, हेच या कार्यक्रमातून जाणवल्याचे महापौरांनी सांगितले . प्रत्‍येक मनुष्‍याने आपल्‍या आयुष्‍यात तारुण्‍य, संपत्‍ती, सौंदर्य, सत्‍ता याचा कधीही अहकांर न बाळगता आपण समाजव्‍यवस्‍थेचे एक घटक असून लोककल्‍याण हाच आपला उद्देश ठेवला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक ज्‍येष्‍ठ नागरिकाला चांगले आरोग्‍य लाभो अश्‍या शुभेच्‍छा महापौरांनी दिल्‍या. यावेळी वयाचे ९० वर्ष पूर्ण केलेल्‍या सखाराम पाताडे, एम.के. फटनाणी, विरप्‍पा काकनकी, एस.पी.गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्‍ण केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, जैन नायगण या ज्‍येष्‍ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन महापौरांच्या हस्ते सत्‍कार करण्‍यात आला.  मुंबई महानगरपालिकेने २३ विरंगुळा केंद्र उभारले असून २४ वे केंद्र हे आर/ दक्षि‍ण विभागात सुरु करण्यात येत आहे. महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली लवकरच ज्‍येष्‍ठ नागरिक संघाची स्‍थापना करण्‍यात येत असून वर्षातून संघाच्‍या दोन बैठका घेणार असल्‍याचे सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून सांगून, ज्‍येष्ठ नागरिकांना देण्‍यात येणाऱया सोयीसुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी ज्‍येष्ठ नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा श्रीम. रोहिणी कांबळे, महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका हर्षला मोरे, तेजिस्‍वि‍नी घोसाळकर, गिता सिंघण, राजराजेश्‍वरी रेडकर, मरियमा तेवर, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष विजय औंधे, ‘ बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त उदयकुमार शिरुरकर, सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ.संगीता हसनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

One thought on “ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयात यापुढे ५० टक्‍के सूट – महापौर विश्वनाथ महाडेश्वर”
  1. Overdue and much waited demand is looked after, but waiting to be implemented in time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *