ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा
ठाणे : जिल्हा सामान्य रूग्णालय ठाणे येथे जागतिक दिव्यांग सहाययता दिन साजरा करण्यात आला. यावेळी रूग्णालयाच्यावतीने दिव्यांगांच्या कल्याणाविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच विविध उपयोगी वस्तूंचे व प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांगांच्या चेह-यावर हास्य फुलले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संगीता माकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
जिल्हा रूग्णालयाच्या समाजसेवा विभागाच्यावतीने दिव्यांग सहाययता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रूग्णालयाच्यावतीने गरजू व गरीब दिव्यांगाना व्हिलचेअर, ट्रायसिकल, वॉकर कुबडया आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ संगिता माकोडे, डॉ विलास साळवे, डॉ ममता आळसपूरकर, समाजसेवा अधिक्षक श्रीरंग सिद, सारीका चोळे, मेट्रन प्रतिभा बाबू आदी उपस्थित होते. सर्व शिक्षा अभियानामधील मुले व मुलींनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर,परिचारीका व कर्मचारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी रूग्णालयातही दिव्यांगाचा सन्मान करण्यात आला.
समाजसेवा अधिक्षक श्रीरंग सिद यांनी दिव्यांग कल्याणासाठी शैक्षणिक सवलती, नोकरी विषयक सवलती व इतर सवलतीची माहिती देऊन सर्वसमावेशक विकासासाठी परिवर्तनकारी उपाय, प्रवेश योग्य आणि न्याय, जगाला चालना देण्यासाठी नाविण्याची भूमिकाबाबत दिव्यांगांना माहिती दिली. वरिष्ठ आर्थोपिडीक तज्ञ डॉ विकास साळवे यांनी दिव्यांग व्यक्तीच्या अडीअडचणी समस्या व त्यावरील उपाय पूर्नवसन बाबत सखोल मार्गदर्शन करून जिल्हयामध्ये दिव्यांगांना मिळत असणा-या प्रमाणपत्र विषयी मार्गदर्शन केले. तसेच समता स्वतंत्रात बंधूता भेदभाव न करता त्याचे हक्के त्यांना मिळवून देण्याबाबतची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे आयेाजन समाजसेवा विभाग श्रीरंग सिद व सारिका चोळे यांनी केले.