पूजा बेदीने मुंबईत वाटले १ लाख कंडोम

जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृती अभियान

मुंबई : १ डिसेंबर जागतिक एडस दिनानिमित्त वोक्हार्ट फाऊंडेशनच्या मदतीने अभिनेत्री व मॉडेल पूजा बेदीने मुंबईत १ लाख कंडोमचे वाटप केले. एडस रोखण्यासाठी कंडोमचा वापर करण्याविषयी मुंबईत जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्याचाच भाग म्हणून एक लाख कंडोमपचे वाटप करण्यात आले.

मुंबईतील धारावी, खेरवाडी-वांद्रे, खारदांडा, जुहू कोळीवाडा, गजधरबंध- सांताक्रुझ, शिवाजी नगर-जुहू येथील झोपडपट्ट्यांमध्ये या कंडोमचे वाटप करण्यात आले. यावेळी पूजा बेदी म्हणाली की, मी गेली पंचवीस वर्षे एड्स व एचआयव्ही याविषयी जागृती करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. १९९१ मध्ये कामसूत्र काँडोम्ससाठी पहिली सेलिब्रेटी मॉडेल या नात्याने मी नेहमी सुरक्षित शरीरसंबंधांना पाठिंबा दिला आहे. सुरक्षित शरीरसंबंधांना पाठिंबा देण्यासाठी व जागृती करण्यासाठी जागतिक एड्स दिनी एक लाख काँडोम्स वितरित करण्यासाठी वोक्हार्ट फाउंडेशन व भागीदारांना पाठिंबा देताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचे पुजा बेदी म्हणाली.  वोक्हार्ट फाउंडेशनचे विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हुझैफा खोराकीवाला म्हणाले की, यूएनएड्स अहवालानुसार २०१६ च्या अखेरीस, भारतात २.१ दशलक्ष लोकांना एचआयव्ही झाला होता. संक्रमित होणाऱ्या आजारांविषयी ज्ञान व जागृतीचा अभाव असल्याने या आजाराचे प्रमाण वाढते. लोकांमध्ये जागृती करण्याचा व हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी काँडोमचा वापर करण्यास उत्तेजन देण्याचा आमचा हेतू आहे असेही ते म्हणाले. वोक्हार्ट फाउंडेशनने आणि आर. के. एचआयव्ही एड्स रिसर्च फाउंडेशन, मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी (एमडॅक्स) हिंदुस्तान लाइफकेअर लि. (एचएलएल) व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्हू यांच्या सहयोगाने हे अभियान राबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!