मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असल्याचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. तरीही या आदिवासींना या महाराष्ट्रामध्ये आदिवासी असल्याचे वेळोवेळी पुरावे देऊन समाज परंपरेच्या रूळी व जाचक अटीमध्ये अडकवून आदिवासी कोळी महादेव समाजाला जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी रोखले जाते. सह्याद्रीच्या पायथ्यार्यांशी असलेल्या कोळी महादेव जमात बांधवांना जातीचे प्रमाणापत्र कोणत्याही जाचक अटीशिवाय सहजरित्या उपलब्ध होते तर दुसरीकडे सातपुड्याच्या पायथ्यार्यांशी बसलेल्या आदिवासी महादेव कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणात जाचक अटी आणि शर्ती ठेवून जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्रापासून वंचित ठेवले जात आहे,
आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ (वऱ्हाड) आदिवासी कोळी महादेव समाजाच्या अमरावती विभागाच्या वतीने राजेंद्र उर्फ बाबा जुवार तसेच गजानन चुनकीकर समाजाच्या जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र लढयासाठी आमरण अन्नत्याग उपोषण सुरू करून १० दिवस झाले तरीही प्रशासनाला, सरकारला आदिवाशी महादेव कोळी समाजाच्या समस्येची जाणीव झालेली नाही. या उपोषणाच्या सामाजिक लढयात महादेव कोळी समाजाच्या महिला वर्गांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला आणि घेत आहेत. अशातच उपोषणास्थळी सातत्याने दिसणारा भगिनींचा चेहरा म्हणजेच मिराताई कोलटके ! आदिवासी कोळी समाजाचे उपोषण सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत गेले दहा दिवस सुर्य निघाल्यापासून ते सुर्य मावळेपर्यंत उपोषण स्थळी जातीने थांबून समाजातील विविध भागातून आलेल्या महिला व समाज बांधवांची जातीने विचारपूस करून आपल्या पाहुण्याचे स्वागत तसेच पाठिंब्याचे समर्थन बघून उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून मनोबल वाढवणे सोपे व सहज साधारण काम नाही. तरीही स्व:परिवारातील समस्या बाजूला सारून उपोषणस्थळी वेळ देवून समाज सेवा करीत आहेत या आदिवाशी कोळी समाजातील स्त्री शक्तीचे कौतूक होत आहे.