कल्याण : सोशल मिडीयावर महिलेशी मैत्री करत तिच्यासोबत अश्लिल संभाषण करणा-या मंत्रालयातील एका अधिका-याला त्या महिलेने चांगलाच चोप दिला आहे. कल्याणात हा प्रकार घडला असून मंत्रालातील अधिका-याला चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
बदलापूर येथे राहणारी ही महिला एका सामाजिक संस्थेत काम करते. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शिवाजी आव्हाड नामक इसमाने तिच्याशी सोशल मीडियावर मैत्री केली.स्वतःची सामाजिक संस्था नोंदणी करून देतो अस सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला तसेच या महिलेच्या मैत्रिणीला देखील नगरसेविका बनवतो अस सांगत तिच्याशी फोन वर अश्लील संभाषण केलं . त्यानंतर त्याने या महिलांना फोन करून कल्याणातील एका हॉटेल मध्ये भेटण्यासाठी बोलावलं. संतापलेल्या या पीडित महिलांनी त्याला त्याच हॉटेल मध्ये गाठून चांगलाच चोप दिला .याच मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महिलांनी आव्हाड याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र पोलिसांनी आव्हाड विरोधात एनसी दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली मात्र पोलिसांनी या अधिका-याविरोधात एनसी दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल केला आहे. तर पोलिसांनी मात्र महिलेची आणखी काही तक्रार असेल तर त्यांना बोलावलं आहे त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल असे सांगितले