कल्याण : रोटरी क्लबच्या सहकार्याने ठाणे जिल्हयातील १२१ गावे आदर्श करणार असल्याची घोषणा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. कल्याणमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन पर्यावरण या विषयावर परिषदेचे आयेाजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ प्रकल्प प्रमुख मनीषा कोंडसकर संयोजक कैलाश देशपांडे, समन्वयक जितेंद्र नेमाडे, जगदीश म्हात्रे, डॉ शुश्रुत वैद्य, बिजू उंनिथन, निखिल बुधकर नितीन मचकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजना जाहीर झाली आहे. या योजनांचा डीपीआर बनवून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या विविध खात्यांतर्गत काम करून ठाणे जिल्हयातील १२१ गाव दोन टप्प्यात आदर्श करायची आहेत. मात्र रोटरी सारख्या सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मदत झाल्यास एकाच टप्प्यात ही गावे आदर्श करू शकतो. रोटरीने ही १२१ गावे दत्तक घेण्यास सहमती दर्शविली असून त्यामुळे फार मोठं काम केंद्र सरकार आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून या जिल्हयात उभं करता येईल. ठाणे जिल्हयात एकीकडे टोकाचा विकास झालेली शहरे आहेत तर दुसरीकडे टोकाचा अविकसीत भाग आहे. दोन्ही मधलं अंतर कमी झाल्यास ख-या अर्थाने ठाणे जिल्हयाचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल. त्यासाठी हा प्रयत्न असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितलं.

यावेळी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी रोटरीच्या कामाची माहिती दिली. रोटरी ही ११७ वर्षे जुनी संस्था असून, जगभरात १२ लाख रोटेरीयन काम करतात. ठाणे जिल्हयात १०९ क्लब असून, यामध्ये ४ हजार सदस्य आहेत. आज देखील १५ क्लबने एकत्रीत येऊन हा कार्यक्रम राबविला असून ग्रामीण भागात अनेक उपक्रम रोटरीने राबविले आहेत. ठाणे जिल्हयात ४५० चेक डॅम बांधले आहेत. एक हजाराहून अधिक टॉयलेट बांधले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार रोटरीच्या माध्यमातून काम करून ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत मृदा संवर्धन पशु संवर्धन आणि कच-याचे व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहेत यात शहरासह ग्रामीण भागातही कच- याची समस्या वाढत आहे त्यामुळे ग्रामीण भागात कच-याचे व्यवस्थापन करत त्याचा खतात रूपांतर कसे करता येईल याबाबत ड्रायवेस्ट या विषयावर निसर्ग फाऊंडेशन डॉ केळशिकर यांनी मार्गदर्शन केले.

ठाणे जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागाचे अंतर कमी करा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!