हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, सभागृहाचे कामकाज झाले ६९ तास
नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. १२ दिवस सुरू असलेल्या या अधिवेशनात १० बैठक आणि सुमारे ६९ तास ५७ मिनिट कामकाज झाले. सभागृहाचे रोजचे सरासरी कामकाज ७ तास ४६ मिनिटे झाले. या अधिवेशनात १९ विधेयक मंजूर करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाला ११ डिसेंबरपासून सुरुवात होऊन २२ डिसेंबरला संपले. मंत्री उपस्थित नसल्याने १० मिनिटे व अन्य कारणामुळे ४ तास १६ असा एकूण ४ तास २६ मिनिटे कामकाज होऊ शकले नाही. तारांकित प्रश्नांची संख्या ९२४५ तर स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या ६७० होती. सभागृहात एकूण ३६ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. लक्षवेधींची संख्या २७६८ तर स्वीकृत लक्षवेधींची संख्या १२९ होती. ३७ लक्षवेधीवर चर्चा झाली. सदस्यांची उपस्थिती सरासरी ७९.२६ टक्के होती. यात जास्तीत जास्त ९१.५ टक्के तर कमीत कमी ८८.३२ टक्के होती.