मुंबई : एकिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्रयाने थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही असे सांगितल्याचा गौप्यस्फोट केलाय. तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमयया यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा दोन मंत्रयाचा होमवर्क तयार असून,  उद्या १३ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याचा १२७ कोटीचा  घोटाळा उघड करणार असल्याचं सांगितलय. त्यामुळे ठाकरे सरकारमधील ते मंत्री कोण ? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. 


काय म्हणाले चंद्रकांत पाटील …

“कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला असे म्हणाले की, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पनाही नव्हती. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पाटलांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

राऊत म्हणाले, त्यांना अफवा पसरवण्याची सवयच ..
 शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विधानावर सडकून टीका केली आहे.  चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल असे राऊत म्हणाले. 

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ 
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई हणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. त्यामुळे सोमयया कोणत्या मंत्रयाची नावे उघड करतात याकडं लक्ष वेधलय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!