मुंबई : गेल्या काही तासापासून फेसबूक , व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम बंद पडलय. हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याने नेटकरी वैतागले आहेत. त्यामुळे नेटीझन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील काही तासांमध्ये या तिन्ही सेव्हा पूर्ववत होतील, असं सोशल मीडिया एक्सपर्टकडून सांगण्यात येत आहे
रात्री नऊ नंतर फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या तिन्ही अॅपची सेवा अचानक ठप्प झालीय. या तिन्ही सोशल मिडीया साईटचा वैयक्तिक आणि कार्यालयातील कामांसाठी वापर केला जातो. मात्र सेवा ठप्प झाल्याने कामांमध्ये अडचणी येत आहेत.
सर्व्हर अचानकपणे बंद,
जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.
फेसबुक आणि व्हाट्सअॅप टीमने ट्विटरवर यासंबधीची माहिती दिलय. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हाट्सअॅप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद”, असं फेसबुक आणि व्हाट्सअॅप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.