डोंबिवली : हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने बेलग्रेव स्टेडियमवर कल्याण-डोंबिवलीतील तसेच रिजन्सी अनंतम् मधील रासा ग्रुपच्या खेळाडूंनी भारतीय संस्कृतीच्या वेशभूषेत खेळ खेळून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हिंदू संस्कृतीप्रमाणे स्टेडियमवर रांगोळी देखील काढण्यात आली होती. यावेळी अनेक खेळाडूंनी आपापल्या कला देखील सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

रिजन्सी ग्रुप आणि डावखर फाऊंडेशनच्या माध्यमातून एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम डोंबिवलीमध्ये साकार करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवलीतील खेळाडूंना ऑलम्पिकमध्ये स्थान असावे या उद्देशाने हे स्टेडियम सुरू करण्यात आल्याचे डावखर फाऊंडेशनचे संतोष डावखर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या स्टेडियममध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला येथील खेळाडूंनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून केले. या स्टेडियमवर पाश्चात्य खेळ जरी खेळले जात असले तरी भारतीय संस्कृती जोपासणाऱ्या खेळाडूंनी नववर्षाचे स्वागत हिंदू संस्कृती प्रमाणे केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

खेळा संदर्भात माहिती देताना संतोष डावखर म्हणाले, पिकल बॉल स्टेडियममध्ये जास्तीत जास्त सहा कोर्ट असतात. तथापी डोंबिवलीतील बेलग्रेव पिकल बॉल स्टेडियममध्ये आठ कोर्ट आणि चार पॅवेलियंस आहेत. जलद गतीने वाढणारा खेळ म्हणून पिकलबॉलकडे पाहिले जाते. बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळांचे कॉम्बिनेशन म्हणजे पिकल बॉल मानला जातो. हा खेळ इनडोअर आणि आउटडोर पॅडल खेळ आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) खेळू शकतात. पिकल बॉल खेळण्याची पद्धत टेनिस सारखीच असते. कोर्ट बॅडमिंटन कोर्टच्या आकाराचे असते. स्मृतिभंश आणि डोळ्यांचा लुकेमिया टाळण्यासाठी पॅडल किंवा रॅकेटचा वापर करून खेळणारे खेळ खेळावे, असा सल्ला दिला जातो. बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि आता पिकल बॉलला अनन्य साधारण महत्व आहे. 2022 मध्ये वॉशिंग्टनचा अधिकृत राज्य खेळ म्हणून पिकल बॉल या खेळाला मान्यता मिळालेली आहे.

स्पोर्ट्स अँड फिटनेस इंडस्ट्री असोसिएशनने 5 दशलक्ष खेळाडूंसह या खेळाला युनायटेड स्टेट्स मधील सर्वात वेगाने वाढणारा खेळ म्हणून नाव दिल आहे. या खेळाचा आता जगभर प्रसार होत असून अमेरिकेतले खेळाडू, कलाकार, राजकारणी हा खेळ आवर्जून खेळतात. खास करून फिट राहण्यासाठी पिकल बॉल हा खेळ खेळला जातो. कारण कोणत्याही प्रकारची दुखापत या खेळात होत नाही. 10 ते 60 अशा सर्व वयोगटात हा खेळ खेळला जातो. प्लास्टिक बॉल आणि लाकडी पॅडलचा वापर या खेळासाठी केला जातो. जगभर चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पुढच्या दोन वर्षांत ऑलिंपिकमध्ये देखील या खेळाचा समावेश होणार असल्याचा दावा संतोष डावखर यांनी यावेळी बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!