शिवसेनेच्या पुढाकाराने डोंबिवलीत शेतकरी ते थेट ग्राहक ` आठवडा बाजार` …..
डोबिवली : शेतकऱ्यांना आपल्या मालाची किमंत थेट ग्राहकांकडून मिळावी म्हणून राज्य सरकारने शहरात आठवडा बाजार सुरु करण्याचे जाहीर केले होते. शिवसेनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. संत शिरोमणी सावतामाळी अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेने नेते तथा सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागर्दर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील टाटा पवार लाईन येथे डोंबिवलीत शेतकरी ते थेट ग्राहक ` आठवडा बाजार` सुरु झाला आहे.विशेष म्हणजे दर गुरुवारी आठवडा बाजार सुरु राहणार आहे.
यांचे उद्घाटन गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, विधानसभा संघटक तात्या माने, महिला संघटक कविता गावंड, महिला शहर संघटक डोंबिवली ( पश्चिम ) किरण मोंडकर, महिला शहर संघटक ( डोंबिवली पूर्व ) मंगला सुळे, स्मिता बाबर, यांसह किशोर मानकामे, संतोष चव्हाण, स्वाती मोहिते, अनिता ठक्कर यासंह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पणन महामंडळाच्या अतर्गत कोरडवाहू उथान्न फार्मर प्रोडूसर कंपनी असून महामंडळ यांना आठवडा बाजारचे काम देतात. या कंपनीचे चेअरमन मंगेश भिसे यावेळी म्हणाले, पलटण, वाशी, सातारा, जुन्नर, वाई, मंचर, खेड येथून शेतकरी आले आहेत. शेतात पिकविलेला योग्य दरात ताज आणि स्वच्छ माल उपलब्ध करून देतात.डोंबिवलीत शिवसेनेच्या माध्यमातून आठवडा बाजार सुरु केला आहे. यात विधवा बचत गटाचा आहे. या बाजाराला स्थानिकांनीमोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे. डोंबिवलीतील नागरिकांनी या शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळले. त्यांचे कर्ज फिटेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्यां आत्महत्या थांबतील.