गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा राहणार बंद
ठाणे, 1 नोव्हेंबर -ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुध्दीकरण केंद जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात असल्याने पाणी पुरवठा गुरुवार, दि. ०२/११/२०२३ रोजी रात्री १२.०० वा पासून ते शुक्रवार, दि.०३/११/२०२३ रोजी रात्री १२.०० वा पर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहिल.
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंद्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा. किसननगर नं.२, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.