राज्यमंत्रयांनी केली अंध व दिव्यांगासोबत दिवाळी साजरी
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही अंध व दिव्यांसोबत दिवाळीचा आंनद लुटला. जोगेश्वरी पूर्वेतील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री वायकर यांच्याकडून अंध, दिव्यांगांना फराळ व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी खूपच झुंबड उडाली होती अंध व दिव्यांगांनी या कार्यक्रमाचा आनंदपूर्ण वातावरणात आस्वाद घेतला. तसेच गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळात आरे चेकनाका, गोरेगांव (पुर्व) येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येणार असून त्यांना फराळ तसेच भेटवस्तुंचे वाटपही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पौराणिक विषयावर दशावतार कार्यक्रम व भव्य बाजार पेठ भरविण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळात जत्रोत्सवाचा सांगता समारंभ पार पडणार असून यावेळी जोगेश्वरी भुषण पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.