मुंबई :सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी आर्थिक वर्षांत किमान ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना सुतारांच्या पाल्यांना विना अट लागु करावी, पिढ्यान पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक, किल्ले, महाल, वास्तू,
तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. या ऐतिहासिक वास्तूद्वारे राज्य अथवा केंद्र सरकार महसूल जमा करते . त्या महसूलातुन किमान 25% महसूल (रॉयल्टी) वाटा पारंपारीक कारागिरांना देण्यात यावा.अशी मागणी
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे मुख्य प्रशासकीय समन्वयक विद्यानंद मानकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती ,सकल सुतार समाजाच्या वतीने रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संतभूमी श्री क्षेत्र आळंदी येथे फूट वाले धर्मशाळा, ३३२ प्रदक्षिणा रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या महामेळाव्याला विश्वकर्मीय समाजाचे २० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सुतार समाजाचा पारंपारीक व्यवसाय लाकडावर अवलंबून असल्याने जसे वडार समाजास दगड या गौण खनीजास रॉयल्टी मुक्त करून पारंपारीक पद्धतीने व्यवसायास मुभा दिली तशी लाकडा संबंधी परवानगी अट सुतार समाजासाठी रद्द करावी . त्यास अनुसरून क्लस्टर निर्माण करून समाज व्यवसायास औद्योगिक चालना मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात भूखंड प्रदान करण्यात यावेत, आय आय टी मधील कारपेंटरी ट्रेडला जन्मजात सुतार कारागिरांच्या मुले व मुलींसाठी विशेष आरक्षण ठेवून जागा राखीव करण्यात याव्यात., केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना सुतारांच्या पाल्यांना विना अट लागु करावी, पिढ्यान पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक, किल्ले, महाल, वास्तू,तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत.या ऐतिहासिक वास्तूद्वारे राज्य अथवा केंद्र सरकार महसूल जमा करते त्या, महसूलातुन किमान 25% महसूल (रॉयल्टी) वाटा पारंपारीक कारागिरांना देण्यात यावा, ग्रामिण भागातील सुतार कारागिरांना आधूनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची सोय करावी, सुतार समाजाची जनगणना करावी, सुतार समाजातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण व्हावी यासाठी विशेष महिला बचत गट स्थापन करण्यात यावे, विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात वसतीगृहाची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी विशेष बजेट असावे.महा.राज्य बांधकाम कामगार मंडळा अंतर्गत सुतार समाजाची विना अट नोंदणी व्हावी, जन्मजात काष्ट शिल्प बनविणारे कलाकारांसाठी शासनाने राष्ट्रीय प्रदर्शन भरवावे तथा त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे.आदी मागण्यांसाठी
या महामेळाव्यात चर्चा होणार आहे, असे विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ यांनी सांगितले.