नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज पुणे स्थित व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीचा मालक विनोद खुटे यांची दुबईतील मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉंडरिंग कायद्याखाली त्यांची दुबई येथील ३७ कोटी ५० लाख रुपयांचे विविध स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

विनोद खुटे यांचा पुण्यात व्हीआयपीएस ग्रुप व परदेशी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये झालेल्या परदेशी चलन नियमाच्या उल्लंघनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून दुबई मधील त्याच्या मालकीचे विविध फ्लॅट जप्त केले आहेत. या सर्व मालमत्तेची किंमत ही ३७ कोटी ५० लाख रुपये आहे.

विनोद खुटे यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना जादा परताव्याचे अमिष दाखवून ठेवी गोळा केल्या होत्या. त्याच्यावर गेल्या वर्षीच्या २५ मे २०२३ पासून कारवाई सुरु होती. खुटे याने अनेक बेकायदा आर्थिक व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. हवालाद्वारे पैसे पाठवण्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्याची बेकायदेशीर संपत्ती त्याने परदेशातही गुंतवली होती. त्यानुसार त्याच्यावर केलेल्या कारवाईनुसार त्याची दुबईतील फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!