कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करून तब्बल ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या आणि उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठं मोठे दारू निर्मितीचे तळ निर्माण झाले आहेत. दारू निर्मितीचे निर्माण झालेले तळ उध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. झाडाझुडपात निर्माण केली जाणारी दारू बाजारात येण्याआधीच उध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले आहे. उल्हासनगर आणि कल्याण शहराला लागून असलेल्या माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत दारू माफियांसमोर दारू निर्मितीचे मोठे आव्हान उभे केले आहे. या कारवाई मध्ये ६० लिटर गावठी दारू आणि गावठी दारू निर्मितीसाठी आवश्यक असलेले दोन लोखंडी ढोल देखील पथकाला सापडले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी एकूण १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. दारू माफियांनी झाडाझुडपात दारू निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. मात्र दारू माफियांची हि नामी शक्कल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडत सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात दारु माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग झाले आता स्मार्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्य असा साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत असे. मात्र आता कारवाई साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना कारवाई करणे आणि दारू निर्मितीचे तळ शोधण्यात यश हे जलदगतीने येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील स्मार्ट झालेले दिसून येत आहे.

दारूचा पुरवठा करणारी दुचाकी देखील दारूसह ताब्यात

गावठी दारू हि ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला सापडताच ४० लिटर दारू सह दुचाकी पथकाला कल्याण मध्ये मिळाली आहे. मात्र या गाडीवरील चालक दारू माफिया हा फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!