मुंबई, दि. 12: राज्य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील युवकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पोलीस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास या सरकाने काढून घेतला आहे. कंत्राटी तहसिलदारांच्या भरतीचा विषय ताजा असतानाच कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन या सरकारने आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. युवा पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी दृष्टीने पोलीस भरतीचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने द्यावा आणि हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

नियमित नोकरी देणारी भरती प्रक्रीया टाळण्यामागे सरकारचा हेतू काय आहे. सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कंत्राटी पोलीसांच्या हातात देण कितपत योग्य आहे. याचे उत्तर या कंत्राटी सरकारने दिले पाहिजे. राज्यातील तरूण पीढी सरकारला कदापी माफ करणार नाही. हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर तरूणांनी या निर्णयाला विरोध केला पाहिजे, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

युवक-युवतींना नियमित रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करण्याऐवजी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याचे भासवून कंत्राटी भरतीचा घाट घातला आहे. या सरकारच्या या तर्कात कुठलेही तथ्य नाही. एकीकडे पेपर फुटतो तर दूसरीकडे कंत्राटी भरतीची जाहिरात निघते यातून सरकार काय साध्य करणार आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच युवा पिढीने या निर्णयाला कडाडून विरोध केला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!