मुंबई : तारा बनण्याआधीच तुटला की त्याचं अस्तित्व संपून जातं… तसेच बालविवाह झालेल्या मुलामुलींचं शिक्षण घेऊन उभं राहणारं अस्तित्व आधीच संपून जातं. आणि नकळत्या वयातच मुलामुलींचा उल्काकल्लोळ होतो. सध्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. आणि ह्या लॉकडाऊन मधल्या काळात मोठ्या प्रमाणात बालविवाह वाढल्याचे दिसून आले.हे फक्त राजस्थान मध्येच नाही तर महाराष्ट्रातही अनेक ग्रामीण व आदिवासी भागात मुलींचे लग्न अगदी 13 व 14 वयात लावले जातात. त्यांच्या मनाविरुद्ध व इच्छेविरुद्ध त्यांचं संपूर्ण भविष्य ठरवलं जातं ही क्रूर प्रथा जर थांबली नाही तर येणाऱ्या काळात महिला पुन्हा स्वतंत्र भारतातील गुलाम बनून राहतील. असे मत विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी मांडले.

संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अनेक देशिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर मत मांडले आहे. सध्या महाराष्ट्रात आणि देशात साकिनाका बलात्काराची घटना घडल्यापासून एकामागोमाग एक बलात्काराची मालिकाच सुरू झालेली आहे. अशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २१ व्या शतकात ही बाईचं अस्तित्व फक्त घराच्या उंबरठ्यापर्यंतच आहे का…? असा प्रश्न पडतो. महिलांसोबतच अगदी लहान मुलीही बालात्काराच्या , अन्याय – अत्याचाराच्या बळी पडतात. अशातच काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारने बालविवाहांना राज्यात कायदेशीर परवानगी दिली होती. विद्यार्थी भारतीने लागलीच राजस्थान सरकारच्या या अमानवी फतव्याचा निषेध केला. संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच गुजरात राज्यांचे प्रभारी अर्जुन बनसोडे यांच्या नेतृत्वात आमदार जिग्नेश मेवाणी यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. राजस्थान सरकारने जारी केलेला हा निर्णय , काही कालावधीतच मागे घेतला. अशी माहिती विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.

२७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय राजकारणात तालिबान सारख्या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान वर आक्रमक केल्याचे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तालिबान इथवरच थांबले नाहीतर , आम्ही महिला अधिकारांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही. असे म्हटलेल्या तालिबान्यांनी सत्ता बळकवल्याच्या अल्पावधीतच सबंध राष्ट्रात महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली. याचा ही विद्यार्थी भारतीने i_am_with_afgan_girls या हॅशटॅग मार्फत निषेध नोंदवला. अफगाणिस्तानची परिस्थिती पाहता जगाच्या पाठीवर कुठेही महिलांना आजच्या तारखेला ही स्वतंत्रपणे वागू दिले जात नाही , हे लक्षात येते. महिलांच्या अस्तित्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. देशातील महिलांनी व मुलींनी आता न घाबरता पुढे आले पाहिजे. व त्यांच्या सोबत घडलेल्या गोष्टींचा खुलासा केला पाहिजे. गुन्हेगारांना वेळीच आवर नाही घातला तर त्यांची हिंमत दुप्पट वाढते. महिला सुरक्षेबाबतची ही सगळी परिस्थिती पाहता विद्यार्थीभारती संघटना ही यंदाच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त २७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत कार्यक्रम आयोजित करत आहे. अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय सचिव प्रणय घरत यांनी दिली.

कार्यक्रमात अनेक मान्यवर बालविवाह , बाललैंगिक अत्याचार , याबाबत संवाद साधतील. त्याचबरोबर ह्याच संकल्पनांना धरून चित्रकला ,निबंध, लघुचित्रपट , फेसपेंटिंग, रिल्स, फोटोग्राफी, व्यंगचित्र, वक्तृत, कविता, पथनाट्य,एकपात्री,व्यंगचित्र अशा काही स्पर्धांचे ही आयोजन केले आहे.ह्या सर्धेत संपूर्ण महाराष्ट्र भरातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क. साक्षी भोईर :- 8830640563 शुभम राऊत : – 9029616190

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!