शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीला सलामी आणि बालविवाह विरोधी ठराव मांडला !
मुंबई : विद्यार्थी भारती सारखी संघटना आजही तरूणांना घेऊन काम करते ही बाब सुखदायक असून कार्यक्रमात उपस्थित तरुणांच्या मोठ्या संख्येने हेमांगी कवी यांनी आनंद व्यक्त केले. तसेच मुकेश माचकर यांनी देखील विद्यार्थी भारतीच्या या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गाण्यापासून व लखीमपूर मध्ये चिरडून हत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलशला आदरांजली देऊन झाली…तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन एका लहान मुलीचे बालविवाह थांबवून समाजाच्या परंपरेने जखडलेल्या बांधनांना तोडून त्या मुलीच्या हातात पुस्तक देऊन कार्यक्रमाच्या उद्घाटक मंजिरी धुरी यांनी केले. लेखिका व नाट्य दिग्दर्शक वंदना खरे, हेमांगी कवी अल्का गाडगिळ , मुकेश माचकर, मेहुल मेपाणी, हरीश सदानी , भरत इराणी यांची भाषणे झाली.
या मान्यवरांना पुरस्कार प्रदान …
वंदना खरे यांना कविता महाजन पुरस्कार, प्रज्ञा पवार यांना कविता महाजन पुरस्कार, ज्योती ताई बडेकर यांना सावित्री पुरस्कार, विद्या ताई चव्हाण यांना सावित्री पुरस्कार, विजेता ताई भोनकर यांना रमाई पुरस्कार, स्मिता ताई साळुंखे यांना रमाई पुरस्कार, पूजा ताई बडेकर यांना कार्यरत पुरस्कार, गुडडी यांना कार्यरत पुरस्कार पुरस्कार, सलोनी तोडकरी यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार, पूजा मुधाने यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार, अस्मा शेख यांना विद्यार्थी रत्न पुरस्कार, हरीश सदानी यांना शंकूतला परांजपे पुरस्कार, संतोष शिंदे यांना कार्यरत पुरस्कार, हेमांगी कवी यांना स्मिता पाटील पुरस्कार, हेरंब कुलकर्णी यांना कार्यरत पुरस्कार, दीपाली ताई बडेकर यांना स्मिता पाटील पुरस्कार, हेरंब कुलकर्णी यांना कार्यकत पुरस्कार, वर्षा विद्या विलास यांना कार्यरत पुरस्काराने गौरविण्यात आले.
विल्सन कॉलेज ,SST कॉलेज उल्हासनगर तसेच कल्याण, डोंबिवली ,विरार,वसई, माणगाव, सातारा, व मुंबईतील अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी बालविवाह विषयाला घेऊन पथनाट्य, डान्स, एकपात्री अभिनय, नाटक , विविध कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह विरोधी एक ठराव मांडण्यात आला. विद्यार्थी भारतीचे पदाधिकारी अर्जून बनसोडे, श्रेया निकाळजे, साक्षी भोईर पूजा मुधाने शुभम राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकत्याँनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.