स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रिपाइंची सोमवारी विदर्भ राज्य परिषद
मुंबई : विदर्भ राज्य झालेच पाहिजे ही वैदर्भीय जनतेची तीव्र भावना झालीय. सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी काळाची गरज आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवार 18 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आलय. रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह, झांशी राणी चौक; सीताबर्डी नागपूर येथे दुपारी दु. १२.३०वा ही परिषद भरणार आहे. या परिषदेला विविध पक्षाचे विदर्भवादी नेते व पक्षाचे जेष्ठ नेते यांना निमंत्रित करण्यात आलय.
रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थू्लकर हे उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील जनतेच्या प्रश्नावर व विदर्भ राज्यासाठी विदर्भव्यापी जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. .