शुक्रतारा निखळला ! ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते (85 वर्ष) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, अस म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांच्या निधनाने भावगीतातील शुक्र तारा हरपल्याची भावना व्यक्त होतेय.
शुक्रतारा मंदवारा,  भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, स्वरगंगेच्या काठावरती, शतदा प्रेम करावे अशी अनेक गाणी अरुण दाते यांनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली. अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनी मुद्रिका प्रकाशित झाली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होतेय.
**

संगीत क्षेत्रातला ‘शुक्र तारा’ निखळला : मुख्यमंत्री

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात श्री. दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे.
…………………………

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!