जागतिक किर्तीेचे संतुर वादक पं. उल्हास बापट याचं निधन
मुंबई : आपल्या संतुर वादनाने रसिकांची मनं जिंकणारे आणि सभागृह मंत्रमुग्ध करणारे उल्हास बापट यांच वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालय. बापट हे अनेक दिवसांपासून आजारी होते. भारतात नाही तर जगातील अनेक देशांत उल्हास बापट यांच्या संतूरवादनाची कीर्ती पसरली आहे. त्यासाठी बापट यांनी १९८८ पासून कॅनडा अमेरिका आणि इंग्लंडचे दौरे केले आहेत.
पंडित उल्हास बापट यांनी 1970 च्या दशकात आपल्या संगीतमय प्रवासाला सुरूवात केली. पंडित वामन सडोलीकर यांच्याकडे त्यांनी संतुर वादनाची तालीम घेतली. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अनेक गीतांत आणि पार्श्वसंगीतात उल्हास बापट यांचे संतूर वाजले. संतुर हे एक काश्मिरी वाद्य असून, या वाद्याचे खूप कमी वादक महाराष्ट्रात आहे. पंडित उल्हास बापट हे त्यातीलच एक मोठं नाव होत. त्यांनी सर्वप्रथम काम आर डी बर्मन यांच्यासोबत घर या सिनेमात केलं . मराठीतील जैत रे जैत, हिंदीतील इजाजत, १९४२ ए लव्ह स्टोरी, वीरझारा, फना, ओम शांती ओम, फॅशन अशा अनेक चित्रपटांच्या संगीताला त्यांनी संतूरची साथ केली. १९४२ ए लव्ह स्टोरी हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.