डोंबिवली : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिल्याचे पाहावयास मिळत आहे. लसीकरणा विषयी अनेक समज,  गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळे नागरिक स्वतः हुन लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. डोंबिवलीत १०३ वर्षाच्या आजीबाईने लस घेतलीय. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या ९८ वर्षाच्या आजी आणि ९९ वर्षाच्या आजोबाने लस घेतली होती, त्यावेळी मुंबई महापालिकेच्या   ट्विटर हँडलवर एक खास ट्वीट करण्यात आलं होत. त्याला नव्वदीतील ‘तरुणांचे’ लसीकरण असं कॅप्शन देण्यात आलं. होत. त्याची आठवण जागवली असून, मुंबईनंतर आता केडीएमसीत शंभरीतील तरुणांचे लसीकरण पार पडलंय असं म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *