मुंबई : भारतातील सर्वात मोठी एसएफबी बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने (एयू एसएफबी), यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हल मोहिमेअंतर्गत आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.

वर्षभरात नियमितपणे सर्वोत्कृष्ट ऑफर सादर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एयू एसएफबीने एयूच्या क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्ससाठी ही खास शॉपिंग ऑफर आणली आहे. महा सणासुदीसाठीची ही ऑफर येत्या १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी राहणार आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, घरगुती उपकरणे, खाद्यपदार्थ आणि किराणा, मनोरंजन, प्रवास, आरोग्य, ग्राहकपयोगी वस्तू, फर्निचर आणि वस्तू खरेदीसाठी ईएमआय आदींसाठी विविधांगी श्रेणीतील अनेक आघाडीच्या व्यापार कंपन्यांच्या साथीने या अनोख्या ऑफरचा विस्तार राहणार आहे.

एयू एसएफबीच्या ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रमुख ई-रिटेलर मंचावरील शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आकर्षक ऑफर देत आहे. एयू एसएफबीच्या योजनेमध्ये ३० पेक्षा जास्त दिग्गज ब्रँडचा सहभाग आहे. त्याचबरोबर आपल्या आवडीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी 60 पेक्षा अधिक ब्रँड आणि उत्पादनांसाठी थेट ईएमआयचा (मासिक हप्ते योजना) पर्याय देण्यात आलेला आहे.

रिलायन्स डिजिटल, क्रोमा, टाटा क्लिक (CLiQ), विजय सेल्स, गोस्टोअर डॉट कॉम सारख्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक ब्रँडवर ग्राहक आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात; त्याचबरोबर यात्रा, क्लियरट्रिप, ईझीमायट्रीपसारखे यात्रा पोर्टल्स; बिगबास्केट, ब्लिंकीट (Blinkit), जिओमार्ट, इंस्टामार्टसारखे ऑनलाइन किराणा विक्रेते; झोमॅटो, स्विगी, डोमिनोसारखे अन्न वितरण अॅप्स; आणि बूक मायशो, फार्मइझीसारख्या कितीतरी पर्यायांचा या ऑफरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचबरोबर या योजनेचा लाभ घेत मनसोक्त खरेदी करणाऱ्या १११५ भाग्यवान ग्राहकांना एयू स्मॉल फायनान्स बँक प्रीमियम स्मार्ट फोन आणि अॅमेझॉन व्हाउचरसारख्या आनंददायी तसेच आश्चर्यचकीत करणारे बक्षीस दिली जाणार आहेत. नवरात्री आणि दसऱ्यासाठी, एयू एसएफबीने आजपासून नऊ दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीचा धुमधडाका सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!