यूपीएससी परीक्षेत मराठी झेंडा !
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. हैद्राबाद येथील अनुदिप दुरीशेट्टी हा देशात पहिला आला तर अनु कुमारी मुलींमध्ये पहिली आलीय. उस्मानाबादचा गिरीश बडोले हा राज्यात प्रथम आलाय. पहिल्या शंभर मध्य्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थी चमकलेत. त्यामुळे यूपीएससीत मराठीचा झेंडा झळकलाय.
गेल्यावर्षी उस्मानाबादची विश्वांजली गायकवाड हि राज्यात पहिली येण्याचा मान मिळवला होता. ही परंपरा  गिरीशने कायम राखली.  उमरगा तालुक्यातील कसगी हे गिरीशचे गाव आहे. गिरीश चे शिक्षण श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित श्रीतुळजाभवानी सैनिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यत झाले.  पुढील शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात घेतले.  सैनिक शाळेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातुन त्याची निवड झाली होती. अंत्यत हुशार व शांत विद्यार्थी अशी त्याची शाळेत ओळख होती.  दिग्विजय बोडखे हा देशात ५४ आला असून, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांचा चिरंजीव आहे.
दिग्विजय चे अभिनंदन करताना वडील गोविंद बोडके
मराठी पाऊल पडते पुढे ..
गिरीश बडोले(२०), दिग्विजय बोडखे(५४), सुयश चव्हाण(५६), भुवनेश पाटील(५९), राहुल शिंदे(९५), मयूर कठावते(९६), विदेह खरे (९९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!