मुंबई : काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले. राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देऊन, त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती.