नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला यावेळी अनेक मोठया घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतूक केले असतानाच दुसरीकडे विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प कॉपी पेस्ट असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील अर्थसंकल्पाची कॉपी पेस्ट असून, हा खुर्ची बचाव बजेट असल्याची टीका त्यांनी केली.
काय म्हणाले राहुल गांधी
या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नाही. अदानी- अंबानी ला फायदा होईल असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला. अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठया घोषणा करण्यात आल्या आहेत त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे हा खुर्ची बचाव अर्थसंकल्प असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी इतर राज्यांच्या जीवावर मित्रांना खूश करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी नाराजी राहुल यांनी व्यक्त केली आहे.