दाऊदचे वास्तव्य कराचीत, सेफ हाऊसचे सुरक्षा कवच

इक्बाल कासकरचा गौप्यस्फोट

मुंबई :जगातील सर्वच सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानची राजधानी कराचीतील क्लिफ्‍टनमध्ये राहातो. त्याच्या घराभोवती सेफ हाऊसचे सुरक्षा कवच आहे अशी माहिती दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने गुप्तचर यंत्रणेला दिली आहे. तसचे दाऊदच्या कराचीतील तीन बंगल्याचे पत्तेही दिले.
इक्बाल हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. पाकिस्ताना‍‍त दाऊदची प्रचंड प्रॉपर्टी आहे. बहुतांश फ्लॅट त्याने भाड्याने दिले असल्याची माहिती इक्बालने दिली आहे. मी ड्रग्ज घेतो, मद्यपान करतो, त्यामुळे दाऊद माझ्याशी बोलत नसल्याचे इक्बालने सांगितले आहे.

दाऊदच्या घराचे पत्ते…
पहिले घर..
मोईन पॅलेस
अब्दुल्ला गादीभुवन जवळ,
क्लिफ्‍टन, कराची.
दुसरे घर…
शिरीन जिन्ना कॉलनी,
जैनुद्दन हॉस्पिटलजवळ
क्लिफ्टन, कराची.
तिसरे घर..
मोरान स्क्वेअर, पॅराडाईज हाऊसजवळ,
तवार एरिया,
क्लिफ्टन, कराची.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!