अनधिकृत बांधकामे तोडून एमआरटीपी दाखल करा : केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांनी दिले आदेश
सिटीझन जर्नलिस्टच्या बातम्यांची घेतली दखल
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने जमिनदोस्त करून संबधितांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत पेालीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच ज्या अधिका-यांकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात कसूर केली जाईल त्याची विभागीय चौकशी करण्यात यावी असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त पी वेलारासू यांनी दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिटीझन जर्नलिस्टने अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम उघडली आहे. मंदिरांवर कारवाई केली जाते मग अनधिकृत बांधकामांना अभय का ? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. सिटीझन जर्नलिस्टच्या बातम्यांवर सोशल मिडीयावर कल्याण डोंबिवलीकरांनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर त्याची दखल घेत आयुक्तांनी हे आदेश जारी केलेत. मात्र या आदेशाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी किती पालन करतात याकडं सर्वांचे लक्ष लागलय.
महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास त्या बांधकामांना नोटीसा बजावून त्यांची सुनावणी घेण्यात यावी . सदर बांधकाम हे अधिकृत असल्याचा पुरावा त्या बांधकाम व्यावसायिकाने सादर न केल्यास अथवा सुनावणीस गैरहजर राहिल्यास ३० दिवसात ते बांधकाम तोडण्यात यावे असेही आयुक्तांनी आदेशात म्हटलय. तसेच पालिकेच्या अधिका-यांनी अनधिकृत बांधकाम घोषित केल्यानंतर त्या बांधकामावर तातडीने कारवाई करून संबधित बांधकाम व्यावसायिकावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२,५३, व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ३९७ अन्वये स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतची कारवाई करावी अशा सुचना दिल्या आहेत.
पालिका अधिका-याची विभागीय चौकशी होणार
ज्या ज्या अनधिकृत बांधकामांना अद्यापपर्यंत नोटीस देण्यात आलेल्या नाहीत, अशा बांधकामधारकांना तातडीने नोटीस बजावून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे तसेच या सर्व प्रकरणांचा आढावा अतिरिक्त आयुक्तांनी नियमितपणे घेवून, ज्या अधिका-यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत कसूर केली असेल त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी करावी, असेही स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
http://www.citizenjournalist4.com/dombivli-bakayda-bandhkam-2726/
http://www.citizenjournalist4.com/kdmc-illegal-bandhkam_action-take-report-2873/
http://www.citizenjournalist4.com/dombivli-andhikrut-bandhkam-news1-1868/