अनधिकृत मंदिराच्या बांधकामाविरोधात, समाजसेवकाचे पालिकेत अर्धनग्न ठिय्या आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव) : पूर्वेतील कस्तुरी प्लाझा जवळील एक मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक समाजसेवक महेश निंबाळकर यांनी अर्थनग्न अवस्थेत पालिकेत ठिया आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात त्यांची आई – मालती आणि पत्नी धनश्री यांनी सहभाग घेतला.
पूर्वेतील कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत मंदिराविरोधात निंबाळकर यांनी वर्षभरापूर्वी आवाज उठवला होता. त्यावेळी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात फ़` प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयात गुरुवारी दुपारच्या सुमारास समाजसेवक महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी परवानगी नाकारूनही त्यांनी हे आंदोलन केल्याने या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी कस्तुरी प्लाझाजवळ काही समाजकंटकानी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यत पोलिसांनी हल्लेखोरांपैकी चार जणांना अटक केली आहे. उर्वरित हल्लेखोरांना पोलीस पकडण्यास का विलंब लावत आहे असा प्रश्न करत निंबाळकर यांनी उपस्थित केलाय. एमआयडीसीतील अनेक मंदिरांवर महापालिकेने कारवाई करून जमीन दोस्त केली मात्र या मंदिराला पालिकेकडून अभय दिले जात असल्याचा आरोप करीत निंबाळकर यांनी पालिकेच्या कार्यालयातच उपोषण छेडलंय. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे निर्धार निंबाळकर यांनी केलाय. त्यामुळे फ प्रभाग कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.