गणपती विसर्जन आणि शाळेच्या जागेवर कब्रस्थानचा प्रस्ताव :
विकास आराखडा वादाच्या भोव-यात
उल्हासनगर : तब्बल ३० वर्षाच्या लढ्यानंतर मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळाली. त्या दफनभूमीला सर्वपक्षीयांचा पाठींबा असतानाच आता शासनाकडून दफनभूमीचे आरक्षण हटवून त्या ठिकाणी पब्लिक युटिलिटीचे आरक्षण टाकण्यात आलय. तसेच विकास आराखड्यात कब्रस्थानसाठी कैलास कॉलनी येथील गणपती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे. या तरतूदीमुळे शहराचा विकास आरखड़ा वादाच्या भोव-यात सापडलाय.
मागील तीन दशकापासुन उल्हासनगरातील मुसलमानांकडे हक्काची दफनभुमी नसल्याने मुस्लिम धर्मियांना शव दफन करण्यासाठी अंबरनाथ अथवा कल्याणच्या दफनभुमीत घेऊन जावे लागत असे़ हि होणारी गैरसोय दुर व्हावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रशिद पटेल यानी दफनभुमीची मागणी केली होती. हि मागणी मान्य करीत 2006 मध्ये मौजे म्हारळ येथील सर्व्हे नं. 58 पैकी 2 एकर जागा नगरविकास मंत्रालयाने अधिसुचनेद्वारे पालिकेला दफनभुमी आरक्षणासाठी दिली होती़. ही जागा मोहने बंधाऱ्याला लागुन असल्यामुळे 2008 मध्ये मेरी या शासकीय संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही जागा पुर रेषेत येत असल्याने दफनभुमी होऊ शकत नाही, अशी माहिती नारायण अडवाणी यांच्या याचिकेदरम्यान सादर केली आहे. यामुळे मुस्लिमाना तत्कालीन कॉग्रेस सरकारच्या कृपेनंतरही कब्रस्तान मिळता मिळता राहिले होते. मागील आठ वर्षात हा लढा मुस्लिम संघटनानी अधिक तिव्र केला होता.
दोन वर्षापुर्वी पालीकेच्या महासभेत कॅम्प 1 ते 3 च्या मुस्लिमांसाठी म्हारळ येथे तर 4 व 5 च्या मुस्लिमांसाठी कैलाश कॉलनी येथे दफनभुमी देण्याचा ठराव केला होता. म्हारळ गाव येथील दफनभुमीसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाचा मालकी हक्क दरम्यानच्या काळात ठाणे जिल्हाधिका-यानी रिजेन्सी निर्माण या बांधकाम व्यवसायिकाला दिले होते. त्यामुळे आरक्षित दफनभुमीच्या जागेच्या बदल्यात टि.डी.आर. देण्याची मागणी रिजेन्सी निर्माण कंपनीचे सर्वेसर्वा महेश अग्रवाल यानी पालीका प्रशासनाकडे केली होती. अखेर पालीका आयुक्त बालाजी खतगांवकर आणि आमदार ज्योती कालानी यांच्या मध्यस्थी अंती महेश अग्रवाल यानी कब्रस्तानसाठी दोन एकर आठ गुंडे आणि विद्युत केंद्रासाठी एक एकर जागा पालीकेकडे बुधवारी सुर्पुद केली.
कबरस्थान होणे नाही.. जय हिंद