५० हजार रूपयांची मागणी : अतिरिक्त आयुक्तांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोव़-यात
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर जातीवाचक वक्तव्याकेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता अतिरिक्त आयुक्त विजया कंठे वादाच्या भोव- यात सापडले आहेत. एका प्रकरणात ५० हजार रूपये मागणी करीत असल्याचा कंठे यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर कॅंप ५ येथे राजु झनकर यांची मिळकत असुन त्या मिळकतीला रस्ता नसल्याने ते महापालिके कडे तीन ते चार वर्षापासुन रस्ता मिळावा म्हणुन पाठपुरावा करत आहेत. या मिळकतीला रस्ता मिळवुन देण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विजया कंठे यांनी कथितरित्या ५० हजार रुपयाची मांगणी केली असल्याचा आरोप राजु झनकर यानी केला असून तसा व्हिडियो देखील त्यानी व्हायरल केला आहे . या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे व हे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना कंठे यांनी मनपाच्या पथकासह माझ्या घरी येऊन माझे व माझ्या पत्नी व परिवाराचे फोटो देखील काढले असून या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस उपायुक्त उल्हासनगर यांच्याकडे तक्रारी केल्या असल्याचे झनकर यांनी सांगितले. वकिलाला फी देण्यापेक्षा मलाच ५० हजार रूपये फी द्या अशी मागणी कंठे या व्हिडीओत करताना दिसत आहेत. या संदर्भात विजया कंठे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मी एक जबाबदार महिला अधिकारी असून एका षडयंत्राद्वारे मला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना व्हिडीओ व्हायरल केला जातोय ही अतिशय गंभीर बाब आहे , आजकाल कोणाचेही चेहरे लावून संगणकाद्वारे काहीही केले जाऊ शकते. मी या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे .