महिला सहाय्यक आयुक्तांसह, लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात 

उल्हासनगर ;  एका बांधकाम धारकाने त्याचे बांधकाम तोडू म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या स्थगन आदेशाला सहकार्य करणासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना उल्हासनगर पालिकेतील विधी विभागाच्या महिला सहाय्यक आयुक्तांसह लिपिकाला अटक करण्यात आली आहे.
छाया डांगळे व दीपक मंगतानी अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर सापळा रचण्याची व अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्याची कामगिरी ठाणे अँटी करप्शनचे उप अधीक्षक वाल्मिक पाटील यांच्या पथकाने केली आहे. तक्रारधारकाने त्याच्या प्लॉट मध्ये बांधकाम केलेले आहे. ते पालिकेने तोडू नये म्हणून त्याने न्यायालयातून स्थगन आदेश मिळवता होता.सदर स्थगन आदेश व तक्रारधारक यांच्या बाजूने न्यायालयात से दाखल करण्यासाठी छाया डांगळे,दीपक मंगतानी यांनी तक्रारधारकाकडे 60 हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यावर 50 हजार रुपयांवर तडजोड होऊन ही रक्कम शुक्रवारी 9 तारखेला देण्या-घेण्याचे ठरले होते. याबाबतची माहिती तक्रारधारक यांनी 7 तारखेलाच ठाणे अँटी करप्शनला दिली होती.त्यानुसार आज उपअधीक्षक वाल्मिक पाटील यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून सकाळी छाया डांगळे यांना उल्हासनगर पालिकेत व दीपक मंगतानी यांना त्यांच्या निवासस्थानी लाच स्विकारताना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *