साडेतीन हजार रुपयात प्रसूती तर 12 हजार रुपयात सिझरीयन, महिलेच्या कुटुंबाचा 1 लाखांचा अपघाती विमाही 

उमाई जननी योजनेचे आमदार नरेंद्र पवार यांनी केले लोकार्पण 

कल्याण : सर्वसामान्य महिलांनाही प्रसूती काळातील सुविधा अत्यल्प दरात मिळवून देणाऱ्या “उमा जननी”योजनेचे लोकार्पण कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले.  अवघ्या 3 हजार 500 रुपयांत नैसर्गिक प्रसूती, सिझरीयन (गरज पडल्यास) 12 हजार रुपये आणि अत्यल्प दरात आरोग्य तपासणी, महिलेच्या कुटुंबाचा 1 लाखांचा अपघाती विमा असे या योजनेचे वैशिष्ट आहे.

यावेळी झालेल्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला भाजप ठाणे विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, आर कें. वैष्णव, बाळकृष्ण गायकवाड, उमेश पाटील, डॉ. राव, प्रेमसागर बैरागी, उमा रुग्णालयाचे डॉ. साईनाथ बैरागी, संतोष बैरागी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  अशा प्रकारे एका खासगी रुग्णालयाकडून अत्यल्प दरात प्रसूती काळातील वैद्यकीय सेवा देण्याचे हे महाराष्ट्रातील बहुधा पहिलेच उदाहरण असून इतरांनीही त्याचे अनुकरण करण्याची गरजही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

शासन स्तरावर योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार पवार

उमा फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येणारी ‘उमाई जननी आरोग्य कवच योजना’ शासन स्तरावर राबवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. राजकारणी म्हणून आम्हाला असे वाटते की आम्हीच लोकोपयोगी कामं करीत असतो. मात्र उमा फाऊंडेशनने उमा फर्टिलिटीसारख्या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून राबवलेली ही योजना राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असताना डॉ. साईनाथ बैरागी यांनी ‘उमा जननी आरोग्य योजने’तून घेतलेला पुढाकार निश्चित कौतुकास्पद असल्याचे आमदार पवार म्हणाले. तसेच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही योजना राज्यस्तरावर कशी राबवता येईल यासाठी नक्की प्रयत्न करू असेही पवार यांनी सांगितले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या योजनेबद्दल उमा फाऊंडेशनचे कौतुक केले आहे.

*ही आहेत योजनेची वैशिष्ट्य…*

केवळ 3 हजार 500 रुपयांत नैसर्गिक प्रसूती…
सिझरीयन (गरज पडल्यास) 12 हजार रुपये…
अत्यल्प दरात आरोग्य तपासणी….
महिलेच्या कुटुंबाचा 1 लाखांचा अपघाती विमा…

माहितीसाठी संपर्क :   9930894895   /02516515121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *