उल्हास उपखोऱ्याचा एकात्मिक जल आराखडयाची
मंगळवारी कार्यशाळा आणि जनसुनावणी
ठाणे : उल्हास उपखोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात येत असून त्याला  अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी मंगळवारी 23 जानेवारीला जनसुनावणी घेण्यात येणार आहे. ही जनसुनावणी सकाळी 11ते 5 पर्यंत  सिंचन भवन, पाचवा मजला, कोपरी कॉलनी, ठाणे येथे घेण्यात येणार आहे. आराखडा तयार करण्यापूर्वी  जलसंधारण,  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,  कृषी,  महाराष्ट्र जीवन,  प्राधिकरण उद्योग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ‍ यांच्याकडून सद्य:स्थितीतील व भविष्यकालीन(सन 2030) पाण्याची गरज विचारात घेण्यात आली आहे.
पश्चिम वाहिनी नदया खोऱ्याची विभागणी २६ उपखोऱ्यामध्ये करण्यात आली असून या प्रत्येक उपखोऱ्याचा प्रारुप जल आराखडा तयार करण्यात आला आहे. उपखोऱ्यातील भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे, जलसंपत्ती संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे ही या जल आराखडयाची प्रमुख उद्दीष्टे आहेत. त्यानुसार कोकणातील उल्हास खोऱ्याचा प्रारुप जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तरी सदर कार्यशाळेत सर्व संबंधितानी उपस्थित राहून आपली मते नोंदवावीत असे आवाहन अधीक्षक अभियंता,ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांनी केले आहे. www.wrd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर हा आराखडा प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

उल्हास खोऱ्यामध्ये या जिल्हयाचा समावेश
1) ठाणे जिल्हा –  अंबरनाथ,  भिवंडी, कल्याण,  मुरबाड,  शहापूर,  ठाणे,  उल्हासनगर, वसई. 2) रायगड जिल्हा-  कर्जत,  खालापूर,  पनवेल.
3) पुणे जिल्हा- आंबेगाव,  जुन्नर,  खेड,  मावळ.
4) नाशिक जिल्हा- इगतपुरी.
5)अहमदनगर जिल्हा- अकोले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *