30 कोटींची बोगस सनद प्रकरण : सात जणांविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर : उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासात शासनाच्या तब्बल 30 करोड रूपये किंमतीच्या भूखंडाची सनद बोगस असल्याचे समोर आले होते. ही सनद बनविणारे बांधकाम व्यवसायिक किशन लाहोरी, घनश्यामदास तुनिया यांच्यासह सहा जण हे सकृतदर्शनी दोषी आढळल्यानंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यानी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे याना दिले होते. या आदेशाचे पालन करीत शुक्रवारी  घनश्यामदास प्रेमचंद तुनिया, किशन परामचंद लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदा लालचंद चावला, सेवलदास वरियलदास बिजलानी आणि त्यांची पत्नी भागीबाई अश्या सात जणांविरोधात  मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोती दुसेजा यानी 2014 मध्ये घनश्यामदास तुनिया, किशन लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदा लालचंद चावला यांच्याबरोबर मिळून 15 हजार चौरस फुटाची प्लॉट क्र. 620, शिट नंबर 76 ही खरेदी केली. हि मालमत्ता रजिस्टरी करताना या मालमत्तेला सनद नाही, मग रजिस्टरी कशी होऊ शकते, असा प्रश्न दुसेजा यानी भागीदाराना विचारला असता त्यानी या भूखंडाची बोगस सनद बनविणार असल्याचे सांगितले. दुसेजाना चुकीचे काम करायचे नसल्याने त्यानी भागीदारीचे पैसे परत घेत, या भूखंडाची सनद कशी बनली याचा तपास करण्यासाठी महसुल विभागाचे अप्पर सचिव याना तक्रार दिली होती. या तक्रारीचा दुसेजा यानी तब्बल दोन वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिका-यानी शासनाला दिलेल्या अहवालात सनद तपासणीबाबत पुण्याच्या सि.आय.डी. विभागाने सनदांवरच्या सहया हया बोगस असल्याचे नमुद केले आहे. त्यानुसार तहसिलदार उत्तम कुंभार यांच्या आदेशाने भूखंडावर दोन महिण्याभरापुर्वी फलक ही लावला आहे. याबाबत मोती दुसेजा यानी सांगितले कि या प्रकरणात दोषी आढळलेले लिपीक प्रकाश गायकवाड आणि ईश्वरी पमनानी यांची कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू    आहे. महिन्याभरापूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यानी उपविभागीय अधिका-याना आदेश दिले होते. त्यानुसार हा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *