युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद अगदी भारत – चीन वादासारखाच आहे. भारताने तिबेट हे बफर राज्य चीनच्या दबावापोटी देऊन चिनला आपल्या सिमेवर आणले. ही चूक रशिया होऊ देऊ इच्छित नाही. जर युक्रेन राज्याची इच्छा असल्याप्रमाणे ते नाटो मध्ये सामील झाले तर नाटोची सीमा थेट रशियाच्या सिमेवर पोहोचेल.भारतापेक्षा चीन खूप शक्तीशाली असल्यामुळे भारताला इच्छा असूनपण तिबेट बाबत चीन समोर माघार घ्यावी लागली, त्याचे परिणाम आज भारत भोगत आहे.
रशिया शक्तीमान असल्यामुळे युक्रेन हे बफर राज्य नाटोच्या हातात जाऊ नये यासाठी वेळ पडल्यास अमेरिका, युरोप, यु.के चीनच्या पाठीब्यांवर यांच्या विरुध्दात युध्द करण्यास तयार आहे. यात यश मिळाल्‍यास रशियाच्या मदतीने चीन महायुध्दाची भिती जगाला दाखवून तैवान गिळंकृत करेल.


चीन आणि रशिया हे डिक्टेटर कंट्रोल्ड राष्ट्र आहेत. त्यांच्या निर्णयास विरोध त्यांच्या देशातून अपेक्षितच नाही. परंतू लोकशाही देश अमेरिका, युरोपीयन राष्ट्रे, यु.के. येथे निर्णय नाही घेतला तरी काहींचा विरोध आणि निर्णय घेतला तरी काहींचा विरोध त्यामुळे ते या परिस्थितीत अपयशी होण्याचीच शक्यता अधिक आहे .या देशातील सामान्य माणूस दुस-या महायुध्दानंतर अति सुखासीन झाल्यामुळे लढाई करण्यापेक्षा खडयांत गेले युक्रेन असा मानस होऊ शकतो. रशियाला हवा तर युक्रेनचा ताबा घेऊ दे आपण मस्त सुखात राहू ही वृत्ती दिसते. त्या नाटोच्या राष्ट्रांमध्ये एक वाक्‍यता नाही. बरोबर याच मनोवृत्तीचा फायदा आज चीन आणि रशिया उचलत आहेत.


प्रश्न आपला भारताचा आहे. अमेरिका आणि रशिया दोन्ही आपले मित्र आहेत. म्हणजे आपण या दोघांवर अवलंबून आहेात. आपणास दोन्ही पैकी कोणा एकास या क्षणी दुखवता येणार नाही. व कोणा एकाची बाजू पण घेता येणार नाही. अशी दोलायमान परिस्थिती आज भारताची आहे.
पूर्वी मोकळया मनाने भारतांने तिबेट चीनला देऊन जी महान चूक केली ती रशिया आज करु इच्छित नाही. हे जगाला सांगावे. युक्रेनला नाटोमध्ये वरिल विवेचनामुळे न घेता रशियाकडून तहहयात कधीही एकइंच पण युक्रेनचा भूभाग घेणार नाही, आक्रमण करणार नाही मात्र तसे झाल्यास युक्रेन नाटो राष्ट्र असल्याप्रमाणेच नाटो युक्रेनचे रक्षण करेल असा करार करावा. असा सर्व समावेश शांततेचा प्रस्ताव देऊन भारताने ही समस्या सोडविल्यास जे सहज शक्य आहे ते करुन जगावरचे संकट दूर करण्यात पुढाकार घ्यावा असे मला वाटते.मी वर्तमानपत्राचा वाचक आणि सामान्य नागरिक असून माझे विचार लिहिले आहेत. (युक्रेन – रशिया वादावर आपणाला काय वाटत, आपणही आपल्या मत ‘ Citizen opinion’ वर मांडू शकता. संपर्क Whattsup no 9821671737.)

डॉ. सुरेश आडकर, डोंबिवली
मोबाईल : 9820037341

One thought on “Citizen opinion : युक्रेन – रशिया सिमावाद भारताची अपेक्षित भुमिका ……”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!