सत्ता असो वा नसो शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार : खासदार छ उदयनराजे भोसले 
पवार फडणवीस यांच्या उपस्थितीत उदयनराजेंच्या ५१ वा वाढदिवस साजरा

सातारा : ‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठी जगेन असं भावूक उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी काढलं. उदयनराजेंच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
उदयनराजे भाषण करताना खूपच भावूक झाले होते. सगळयाच मान्यवरांनी माझं कौतूक केलं. कारण नसताना माझी स्तुती केली त्यामुळे माझं मन भारावून गेलं. काल, आज आणि उद्या जे करणार ते तुम्हा सगळ्यांना आणि या मान्यवरांना केंद्रबिंदू ठेऊन, माझं कर्तव्य म्हणून करणार. त्यात कुठेही कमी पडणार नाही. असं उदयनराजे यावेळी म्हणाले. अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना माझं एवढं कौतुक केलं. मला वाटलं आता मला डायबेटिस व्हायचा. पण खरोखर ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांचं प्रेम कायमस्वरुपी मिळत राहो. यामुळे काम करत राहण्याची एक उर्जा मिळते.’ असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे एक मुक्त विद्यापीठ : मुख्यमंत्री

उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत मात्र, राज्याच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहेत. या विद्यापीठाचे नियम ते स्वत: तयार करतात आणि त्या नियमाची अंमलबजावणीही तेच करतात, त्यांच्या नियमाचं पालन जे करत नाहीत त्यांना शासनही तेच करतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने तमाम जनता त्यांच्यावर आज प्रेम करते.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  उदयनराजे हे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही पर्वा न करता आवाज उठवणारी व्यक्ती आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचे कौतुक केले. उदयनराजेंवर आम्ही छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो. उदयनराजे आणि माझी अनेकदा भेट होते. मात्र, प्रत्येकवेळी ते साताऱ्यासाठीच काहीतरी मागतात. उदयनराजेंनी केलेली साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला त्यांनी यावेळी जाहीर मान्यता दिली.
——-

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *