कल्याण डोंबिवलीला दमडीही नाही : थापाडयांवर विश्वास ठेवू नका : उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्रयावर प्रहार
नांदेड : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी ६५०० कोटी रूपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्रयानी दिले हेाते पण अजूनही एकही दमडी मिळाली नाही. नांदेडच्या विकासासाठी २५ हजार कोटीचे आश्वासन दिले जातील या आश्वासनांना भुलू नका आणि थापाडयांवर विश्वास ठेवू नका असा जोरदार हल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर केला.
नांदेड महापालिकेच्या प्रचाराचा नारळ उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वाढविण्यात आला. ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. गुजरात निवडणुका आल्यावर खाकऱ्यावरचा जीएसटी कमी केला. पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली पण त्यांना आता शाळा आठवली. म्हणून कपाळावर माती लावली. त्यावेळी शाळेत गेले नाही म्हणून आज गेले असे उध्दव म्हणाले. यांचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण स्वतःकडे निष्ठावान उमेदवार नसल्याने इतर पक्षातील उमेदवारांना घेतलं जातय. भाजप आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्योच बोलले जातय पण स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढविण्याचा दम त्यांच्यात नाही. त्यामुळे आमच्या तालमीत तयार झालेले पैलवान घेत आहेत अशी टीकाही ठाकरे यांनी केली. भाजप आणि शिवसेनेत थोडीशी मैत्री अजून शिल्लक असल्याचं सांगत त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आता मंगळावरूनही सदस्यत्वासाठी मिस कॉल येत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
़