गायीला जपायचं अन ताईला झोडायचं असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही : उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्ला
मुंबई : मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर यांच्यावर जहरी टीका केली. गायीला जपायचं अन् ताईला झोडायच असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही अशा शब्दात ठाकरें यांनी हल्ला चढविला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. उध्दव ठाकरे हे भाजपवर काय टीका करता याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते. ठाकरे यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेने सत्ता असेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवले होते. भाजपची आज सगळीकडे सत्ता असूनही महागाई वाढते आहे. यावर ठाकरे यांनी भाजपला खडसावून जाब विचारला. बुलेट ट्रेन म्हणजे फुकटचा नागोबा आहे, पोसणार कोण? रेल्वे दुर्घटनांच्या चौकशीत वेळ घालवते पण पायाभूत सुविधा देत नाही. आमच्या खांद्यावर उगाच मोदींचं ओझं नका टाकू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सगळीकडे चिखल केला आहे. मळ दिसतोय कमळ दिसत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. शिवसेनेचे हिंदुत्व देशहितासाठी आहे. आम्हाला देशद्रोह्यांना बडवणारे हिंदुत्व हवे आहे. भाजपचे हिंदुत्व कोणते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. समान कर लावला असेल तर समान दरही लावा, गेल्या काही दिवसात किती वेळा इंधनाचे दर वाढले. पाकिस्तानप्रमाणे 40 ते 45 रुपयांत पेट्रोल विकलं तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी मारला. “रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला.
़़़़