कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे याच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार देण्याची जोरदार तयारी सूरु केली आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे १३ जानेवारी रोजी कल्याणात येणार आहेत.

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत येत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे शिंदे विरोधात शिवसेनेचा कोण उमेदवार असेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!