ठाणे, अविनाश उबाळे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला टक्कर देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शहापूर तालुक्यात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वासिंद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण शहापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने वासिंद ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे.
वासिंद ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला यामध्ये शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडी यांच्या व लोकनेते स्व. विठ्ठल भेरे वासिंद विकास पॅनलच्या माध्यमातून १७ पैकी १४ जागा तसेच सरपंच पदावर विजय मिळवून एकहाती सत्ता आणली. यामध्ये राजेंद्र सिताराम म्हसकर हे सरपंचपदी निवडून आले. तर सदस्यपदी विनोद बबन म्हसकर, गिता गोरखनाथ भांगरे, ज्योती राजेंद्र भेरे, प्रविण मधूकर सोमासे, विशाखा विकास शेलार, अश्विनी सचिन भेरे, ममता महेश गवई, अपेक्षा महादु बोटे, प्रदिप बंडू भालेराव,प्रतिभा प्रदिप पुंडगे,वैभवी विलास पाटील,युवराज नारायण बांबळे,सपना किरण पगारे, सागर गोरखनाथ कंठे हे विजयी झाले. तसेच विलास धोंडू जगे हे अपक्ष तर संदीप गोविंद पाटील व अरुण विठ्ठल भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, आरपीआय यांच्या पॅनल मधून सदस्य पदी निवडून आले आहेत.