संभाजीनगर : शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय ? असा टोला ठाकरे यांनी लगावला. तर, अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही भ्रष्टाचार करा, आम्ही आमदार, खासदार करणार

उद्धव ठाकरे म्हणाले की, “ तुम्ही भ्रष्टचार करा आणि आम्ही तुम्हाला आमदार खासदार करणार. तुमच्या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या? सगळे भाडोत्री आणले जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करून कर्जमुक्ती जाहीर करू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देत असाल, तर मग गरिबी कुणाची हटवली. देशातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!