नवी दिल्ली– सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नाराज भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दोन दिवसांपासून तळ टाकून बसले आहे. मात्र आजही उदयनराजे भोसले यांची भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झालीच नाही. त्यांची उद्या भेट होणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा झाली असली तरी अनेक जागांवर उमेदवारी बाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले हे नाराज झाले आहेत. उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उदयनराजे भोसले यांची भेटही घेतली होती. मात्र, तरी देखील उदयनराजे भोसले यांची नाराजी दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत अमित शहांशी चर्चा करण्यासाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपूर्वीच दिल्ली गाठली. मात्र या दोन दिवसांत त्यांची अमित शहांसोबत भेट झाली नाही. त्यांची उद्या होणार आहे.