कल्याण : अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीने सह्याद्री पर्वत रांगेतील तीन किल्ले सर केले आहेत. भल्या भल्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले दोन वर्षाच्या प्रचिती प्रदीप घरत हिने सर करून कमाल केली आहे. साडे चार हजार फुटापेक्षा अधिक उंचीवर असणारे किल्ले सर करणारी प्रचितीने सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान पटकावला आहे. तिच्या शौर्याचे सर्वत्रच कौतूक होत आहे.
अलंग,मदन आणि कुलंग म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे सुमारे ४५०० हजार फूट पेक्ष्या ही अधिक उंचीवर वसलेले हे तीन किल्ले. इगतपुरी च्या आंबेवाडी च्या पायथ्याशी असलेल्या गावापासून २ तासांची पायपीट आणि चढण करून गडाच्या पायथ्याशी पोहचता येते आणि तिथून चालू होतो गड सर करण्याचा खरा थरार….अलंग,मदन आणि कुलंग मोहीम यशस्वी करून चिमुकल्या प्रचितीने लहान वयातच आपल्या शौर्याची प्रचिती दखवून दिलीय. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर चे पवन घुगे,दर्शन देशमुख, रणजित देशमुख,भूषण पवार आणि अक्षय जमदारे उपस्थित होते.